Sunday 14 May 2023

खरी सोन्या चि शेती

 


शेती पुरक इतर व्यवसाय



शिंपल्यातून खरे मोती उत्पादन.

मोत्यांचे तीन प्रकार

शेती पूरक व्यवसाय - मोती संवर्धन

मोत्यांचे तीन प्रकार

आपण जे मोत्यांचे दागिने घालतो अगर सोन्यांच्या दागिन्यात जे मोती मढवलेले असतात त्या मोत्यांचे तीन प्रकार आहेत.

१) नसर्गिक २)संवर्धित ३)कृत्रिम

यातला संवर्धित मोती हा ठराविक प्रकारच्या मोती संवर्धित करावयाच्या शिंपल्यात एक छोटीशी शस्रक्रिया करून न्युक्लीअसचे (ठराविक शिंपल्याचा एक तुकडा अगर भुकटी) रोपण करून गोड्या पाण्यात तो शिंपला ३ वर्षे ठेवला जातो. आणि त्या शिंपल्यात तयार झालेला मोती संवर्धित मोती होय.हा मोती नैसर्गिक मोत्यासारखाच असतो. तेवढयाच गुणवत्तेचा असतो.


कृत्रिम मोती मात्र काचेचे तुकडे किंवा मनी माशाच्या खावल्यांपासून बनवलेल्या द्रावणात बुडवून जो थर निर्माण होतो टो वाळवून मोती तयार केला जातो. अर्थात, या मोत्यावरचा हा थर कालांतराने फिका पडतो. थर निघून जातो. तसेच या कृत्रिम मोत्याचा आरोग्यासाठी उपयोग होत नाही. टो खोटा असतो. मात्र संवर्धित मोती हा खरा असतो. अशा मोत्याची निर्मिती करण्यासाठी गोडे पाणी, विशिष्ट प्रकारचा जिवंत शिंपला आणि ग्राफ्त टिश्यू न्युक्लीअस इ.गोष्टी आवश्यक असतात.

खऱ्या पाण्यातील कवचधारी (शिंपला) मत्स्य जीवापासून मिळणारे मोती हे उच्च गुणप्रतीचे असतात पण त्याचे संवर्धन करणे जाकीरीचे असते. गोडया पाण्यातल्या कवचधारी मत्स्याजीवापासून मोती तयार करण्याचे तंत्र करण्यासारखे असते. हे मोती हि उच्च प्रतीचे असतात. यांच्यापासून मोती निर्मिती करणे हि एक फायदेशीर आणि जमेची बाब आहे. त्यांचा गोडया पाण्यातला साठा मोठा असतो. त्यांना उपद्रव कमी असतो आणि संवर्धनाची पद्धत सोयीस्कररीत्या विकसित करता येते म्हणून गोडया पाण्यातल्या शिंपल्यापासून (कवचधारी मात्स्य्जीव) मोती मिळवणे सोपे जाते. गोडया पाण्यात एकूण ५० प्रकारचे शिंपले आहेत, पण त्यातल्या संथ आणि वाहत्या पाण्यातल्या २-३ जातीच फक्त मोत्याच्या संवर्धनासाठी उपयुक्त आहे आणि लामिलीडेंस मार्जीलेनीस आणि लामिलीडेंस कोरीआनसीस या संथ पाण्यांतल्या, तर वाहत्या पाण्यातल्या पराशिया कोरुगेटा त्यांचा मोती संवर्धनासाठी वापर करावा.

प्रत्यक्ष मोत्यांचे संवर्धन करण्यासाठी असे शिंपले गोळा करून संवर्धन करण्याच्या ठिकाणी आणावेत. न्युक्लीअस रोपण शस्रक्रियेकरिता भृण प्रत्यारोपण पद्धतीसारखेच डोनर आणि रेसिपंटची आवश्यकता असते. डोनर म्हणजे रोपणाकरिता लागणाऱ्या टिश्यूची पूर्तता करणारा शिंपला आणि रेसीपंट म्हणजे रोपण शस्रक्रिया करवून घेऊन प्रत्यक्ष मोती संवर्धन करणारा शिंपला. डोनर शिंपल्यातून विशिष्ट पद्धतीने ग्राफट टिश्यू आणि मॅटल टिश्यू मिळवण्यात येतो. हे ग्राफ्त टिश्यू आणि मॅटल टिश्यू रेसीपटमध्ये न्वूक्लीआस रोपणासाठी वापरतात. प्रत्यक्ष न्युक्लीआस रोपणासाठी करण्यासाठी तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची थोडी फार गरज असते. प्रशिक्षण घेतल्यास न्वूक्लीआस शस्रक्रिया (वेगवेगळ्या कलम पद्धतीचे प्रशिक्षण घेतल्याप्रमाणे) करणे सोपे जाते. मार्च ते मे या दरम्यान हि न्युक्लीआस रोपण शस्रक्रिया करण्यासाठी चांगला कालावधी असतो. कारण शास्रक्रियेची जखम लवकर भरते. मोती तयार होण्याची प्रक्रिया वेगात होते.

न्युक्लीआस रोपणाच्या (शस्रक्रिया) ३ पद्धती आहेत. त्या म्हणजे १) मॅटल कॅविटी इन्सर्षण २) मॅटल टिश्यू इन्सर्षण ३) गोनाडल इन्सर्षण. या पद्धती कशा करायच्या याचे प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे.

शास्रक्रीयेद्वारे रोपण केलेले शिंपले गोडया पाण्यात २-३ वर्षे पाळावे लागतात. हे शिंपले पाण्यातील सूक्ष्म वनस्पती प्लवगांवर उपजीविका करतात. म्हणून त्याची चांगली वाढ होण्यासाठी त्या गोडया पाण्यात शेण आणि सुपर फोस्फेटचा वापर करावा. पहिल्या वर्षापेक्षा दुसर्या आणि तिसर्या वर्षी मोती तयार करण्याच्या द्रावणाचे प्रमाण चांगलेच असते म्हणून गुणवत्तेचे मोती दुसर्या वर्षापासून, तर तिसर्या वर्षी जास्त गुणवत्तेचे मोती मिळतात. पहिल्याच वर्षीच जर मोती काढून घेतले तर ते वेडेवाकडे निकृष्ठ दर्जाचे असतात. तयार झालेले मोती शिंपल्यातून काढून घेतल्यानंतरही त्याच्यावर स्वच्छ करण्याच्या, पारदर्शीपणा येण्यासाठी आणि रंगीतपणा येण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात. याही प्रशिक्षणात शिकवल्या जातात. अशा तयार झालेल्या गुणवत्तेच्या खरया मोत्यांना मोठी किमतही मिळते आणि मागणी तर प्रचंड आहे.

शेती पूरक व्यवसाय - मोती संवर्धन

आतापर्यंत हा मोती संवर्धनाचा व्यवसाय खाजगी व्यक्तीपुरताच मर्यादित आहे. हा कुटीर उद्योग म्हणून शेतकऱ्यांनी, तरुण बेरोजगारांनी छोट्याश्या प्रशिक्षनानंतर सुरु करावा. कारण गोडया पाण्याची उपलब्धता खूप आहे शिवाय अत्यल्प खर्चाचा, कमी मेहनतीचा आहे. प्रचंड मागणीचा, प्रचंड पैसा मिळवून देणारा आहे. म्हणून खेड्यापाड्यात शेतीच्या इतर पूरक व्यवसायाबरोबर गोडया पाण्यात मोती संवर्धन व्यवसाय सुरु करावा हाच या पाठीमागचा उद्देश आहे

याच्यापासून आपण खूप काही कमी करू शकतो कमीत कमी सहा महिने ते   वर्षभरात  कमीत कमी क्षेत्र उत्पन्न जास्ती जास्त

पुढील माहिती आणि  व्हिडीओ काही दिवसात टाकला जाईल.

No comments:

Post a Comment

जिल्हा उदयोग केन्द्र माहिती

  सुधारित बीज भांडवल योजना जिल्हा उद्योग केंद्र ते कर्ज योजना उद्योग उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम...