Tuesday 9 May 2023

ना बिडी, ना दारु, 'या' गावात साधी चहाची टपरीही नाही! व्यसनांपासून चार हात लांब; आदर्श गावाची होतेयं राज्यात चर्चा

 सध्याची तरुणाई मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत आहे. ज्यामुळे गुन्हेगारी, मारामाऱ्या अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. व्यसनांकडे तरुणाईचा वाढता कल सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरत असताना बीड जिल्ह्यात एक चकित करणारी कौतुकास्पद बाब समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील एका गावात दारु, बि


डी, तंबाखू इतकेच काय तर चहाची टपरी सुद्धा नसलेले अनोख्या गावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. व्यसनांना आळा घालणारे हे गाव सध्या राज्यात आदर्श गाव म्हणून कौतुकाचा विषय ठरत आहे. जाणून घेवूया या अनोख्या गावाची संपूर्ण कथा...आदर्श गाव करंजी...

आतापर्यंत आपण एखाद्या गावात प्रवेश केला की देशी दारूचे दुकानं, येथे तंबाखू, सिगारेट, पान मिळेल. अशा एक ना अनेक व्यसनाच्या साहित्याच्या पाट्या लावलेली दुकाने पाहिले असतील. मात्र बीडच्या आष्टी तालुक्यातील करंजी गाव या व्यसनापासून आणि अशा पाट्यांपासून दूर आहे. या गावात एकही पानटपरी, देशी दारू दुकान, अथवा चहाचे हॉटेल नाही. गावची लोकसंख्या जवळपास 650 च्या घरात आहे. मात्र गेल्या अनेक दशकापासून इथला एकही तरुण अथवा व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेला नाही.भांडण- तंटा मुक्त गाव... म्हणजे हीच बिगर व्यसनाची परंपरा आता गावचे सरपंच भरत आजबे यांनी पुढे चालवली आहे. आज या करंजी गावात पाणी फाउंडेशन चे काम एकजूटीने पूर्ण झाली आहेत. लोकांची जिरवण्यात वेळ घालण्यापेक्षा इथला ग्रामस्थ "पाणी आडवा पाणी जिरवा" चा संदेश देताना दिसत आहे. त्यामुळे हे गाव तर पाणीदार झालंच, पण गावात भांडण तंटा हि व्यसनाबरोबर मुक्त झाले आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यातच नाही तर देशभरामध्ये व्यसनामुळे गुन्हेगारी वाढली आहे. भावाभावात, गावागावात भांडण होत आहेत. मात्र या व्यसनापासून दूर राहण्यासाठी स्वतः गावकऱ्यांनीच हा अनोखा संकल्प केलाय. आणि गाव गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्त आहे. त्यामुळे या गावाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा होताना दिसत आहे. तसेच राज्य आणि देशभरातील गावकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही..

No comments:

Post a Comment

जिल्हा उदयोग केन्द्र माहिती

  सुधारित बीज भांडवल योजना जिल्हा उद्योग केंद्र ते कर्ज योजना उद्योग उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम...